शाडूचा तयार झालेला गणपती

शाडूच्या मातीचा गणपती

गेल्या शनिवार-रविवारी मी एका ’पर्यावरणस्नेही गणपती अभियान” कार्यशाळेत गेलो होतो. आजकाल सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरीस च्या मूर्त्या वापरल्या जातात, ज्यामुळे पर्यावरणात प्रदूषणाची समस्या भेडसावू लागली आहे. गणपती तर आणायचा आहे….पण प्रदूषणाचीही समस्या सोडवायची आहे तर त्यावर तोडगा म्हणून शाडूची माती आणि कागदाचा लगदा वापरून या मूर्त्या तयार केल्या जातात. त्यात भाग घेतल्यावर स्वत: ही मूर्ती कशी तयार करायची याचे शिक्षण दिले जाते , आपण तयार केलेली मूर्ती आपल्याला घरी घेऊन जायला मिळते. हे पहा मी प्रत्यक्ष काम करत असताना केलेले शूटींग.

ही मी तयार केलेली मुर्ती, अर्धवटच आहे… अजून संपूर्ण तयार व्हायची आहे. ह्या मूर्तीला हात बसवून साधारणत: ३ आठवडे ती वाळण्यासाठी जावे लागतील. त्यानंतर मग रंगकाम.

शाडू आणि कागदाचा लगदा वापरून तयार केलेली मुर्ती

शाडू आणि कागदाचा लगदा वापरून तयार केलेली मुर्ती