मी आणि माय फ्रेंड गणेशा

लहानपणापासून मी गणपती बाप्पाला माझा मित्रच मानत आलोय. एखादी मनातली गोष्ट त्याला सांगितली आणि त्याने मला मदत केली नाही असे कधी झालेच नाही.

इवल्या इवल्या घरट्यात

चिकणमातीच्याच मदतीने केलेले एक वठलेले झाड, त्यावरचे पक्षाचे घरटे आणि कदाचित पिलांकरता दाणापाणी आणायला गेलेल्या जोडीदाराची चातकासारखी वाट पहणारा हा पक्षी.

डायनॉसॉर्सचे भांडण

प्रत्येक प्राण्यातलं मातृत्व हे तितकंच वात्सल्यपूर्ण असतं. माणूस म्हणून प्रेमळ, आणि वाघ, सिंह म्हणून क्रूर असा काही फरक नसतो. उलटपक्षी प्राणी हे जास्तच प्रेमळ वागतात. आणि माणसाने बेताल वागायला सुरूवात केलीय. इथे डायनासॉरचे एक पिल्लू , त्याची आई आणि कळपातले / इतर डायनॉसॉर्स जणू त्या पिल्लाला ’छोटा बच्चा जान के’ त्रास देत आहेत आणि त्याची बाजू घेऊन त्याची आई इतरांना ’मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है’ असं प्रसंग उभा केलाय चिकणमातीच्या मदतीने.